लहरी

Thursday, February 23, 2006

मेरा भारत महान

(सगळे एकत्र)
अर्थमंत्री, अर्थमंत्री,
कसा असेल अहवाल ?
कोणाची मज्जा असेल ?
आणि कोणा कोणाचे हाल ?

(पहिला गट)
अर्थमंत्री, अर्थमंत्री,
सब्सिडी आमची माय
पेट्रोल, रेशन वाढवू नका हो,
शिवाय घरगुती गॅस चे काय ?

(दुसरा गट)
अर्थमंत्री, अर्थमंत्री,
कराचा बोझा वाढेल ?
इन्कम टॅक्स आणि सर्विस टॅक्स
मध्यमवर्गियांना गाढेल ?

(तिसरा गट)
अर्थमंत्री, अर्थमंत्री,
आम्हीच अर्थव्यवस्थेला तारी
जरा आमच्यापण गरजांचं बघा
गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्युवेलरी

(तिनही गट एकत्र)
अर्थमंत्री, अर्थमंत्री
सब्सिडी जास्ती आणि टॅक्स व किमती कमी
विकासाची कामे मात्र
वाढत राहतील याची हमी

(अर्थमंत्री)
माझ्या प्रिय देशबंधूंनो,
तुम्ही म्हणाल ते करतो,
सगळ्यांना खुश करून
मतांचे पोते अधिक भरतो

4 Comments:

Anonymous Anonymous said...

हा हा हा! वाचुन मजा आली.

March 06, 2006 9:00 PM  
Blogger Vishal K said...

रत्नदीप,
ब्लॉग आणि कविता आवडल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

April 06, 2006 7:24 AM  
Blogger Ratnadeep Joshi said...

Dhanyawad lokaho.

April 08, 2006 12:24 PM  
Blogger siddhya said...

hehe ek number. tatya tuzyat kuthe tari ek lahan mul daDala ahe :P

July 26, 2006 5:05 AM  

Post a Comment

<< Home