रविवार सकाळ
मी म्हणालो सायकल ला, बरेच दिवसात आपण फ़िरायला गेलो नाही
तशी ती फणका~याने म्हणाली, इतक्या वर्षांत कधी विचारणंच झालं नाही.
मग मी म्हणालो चपले ला, काय म्हणतेस, कशी आहेस ?
तर हसली आणि म्हणाली, इतक्या दिवसांनी आठवण बरी झाली.
मग मी म्हणालो पुस्तकाला, काय रे बाबा, काय चाललंय ?
मिश्किलपणे म्हणाला, काही नाही, धुळीवर रेघोट्या ओढतोय.
मग मी म्हणालो बॅट ला, का गं, काय म्हणतेयस् ?
खोकत खोकत म्हणाली, आता पुर्वीसारखी तब्येत नाही राहिली.
तेवढ्यात सीसीडीतून मित्राचा फोन आला,
अरे लवकर ये, इथे येउन पुढे जायचंय १ च्या शो ला.
अरे बापरे, उशीर झाला की काय,
शी, सकाळपासुन उगाचच रेंगाळलो.
शुज घातले, बाईक वर टांग टाकली,
आणि थेट तिस~या गिअर मध्ये निघालो.
8 Comments:
nice one! :)
मी म्हणालो अभ्यासाला, तयार करायचं लेक्चरला,
लॅपटॉप हळूच म्हणाला, ईमेजेस शोधून ठेव एल्सीडीवर दाखवायला,
ऊद्याचा दिवस सांगतोय, टेस्टचे पेपर्स तपासून द्यायचेत,
पण मराठीब्लॉग्ज.नेट वर, रत्नदीपचा ब्लॉग वाचला,
सर्व कामे फ़ेकून देऊन, एक "बिघडलेला" प्रोफ़ेसर, उत्तर द्यायला बसला.
हेमंत पाटील - सुरत
धन्यवाद लोकहो.
छानच आहे कवीता!
Sahi aahe kavita. Reminds me of lots of things I decide to do over weekend and never actually do it.
Hey.. this peom is really good :)
khoop aavadali!!
sahi dude..
kharech khu chan aahe!!!!
Post a Comment
<< Home