लहरी

Friday, March 10, 2006

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
साठा उत्तरी जरी असली,
'विमेन्स डे' साजरा करून,
पाचा उत्तरी करता आली की !

Tuesday, March 07, 2006

रविवार सकाळ

मी म्हणालो सायकल ला, बरेच दिवसात आपण फ़िरायला गेलो नाही
तशी ती फणका~याने म्हणाली, इतक्या वर्षांत कधी विचारणंच झालं नाही.

मग मी म्हणालो चपले ला, काय म्हणतेस, कशी आहेस ?
तर हसली आणि म्हणाली, इतक्या दिवसांनी आठवण बरी झाली.

मग मी म्हणालो पुस्तकाला, काय रे बाबा, काय चाललंय ?
मिश्किलपणे म्हणाला, काही नाही, धुळीवर रेघोट्या ओढतोय.

मग मी म्हणालो बॅट ला, का गं, काय म्हणतेयस् ?
खोकत खोकत म्हणाली, आता पुर्वीसारखी तब्येत नाही राहिली.

तेवढ्यात सीसीडीतून मित्राचा फोन आला,
अरे लवकर ये, इथे येउन पुढे जायचंय १ च्या शो ला.

अरे बापरे, उशीर झाला की काय,
शी, सकाळपासुन उगाचच रेंगाळलो.
शुज घातले, बाईक वर टांग टाकली,
आणि थेट तिस~या गिअर मध्ये निघालो.