नाठाळ ख़ड्ड्या....
प्रथम तुज पाहता, प्रथम तुज पाहता
जीव कळवळला !
स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी
आत्ताच एकास, चुकवुनी आलो मी,
आत्ताच एकात, जाउनी आलो मी,
सकाळपासुन हा ख़ेळ, खेळत आलोय मी
असाच सामोरे येता, प्रिया बाईक ही डगमगती,
सस्पेन्शन गर्जती, टायर-ट्युब ही वाजती,
नवीन कोरी बाईक माझी, याचसाठी का रे होती ?
रमेश, सुरेश, करीर त्यांचे काय जाती,
दिवसभर लक्झ्युरी कार ने ते फ़िरती,
सामान्य नागरीक मात्र तुमच्यासारख्या,
नाठाळांच्या तोंडघाशी पडती
दिवसभर तुम्ही, त्रास असा देता
तुमचा खेळ होतो,
'मान' पुण्याची जाते